चिंतनें धांवे भक्तां
1150.
चिंतनें धांवे भक्तांपाठीं । धरी कांबळीं हाती काठी । चिंतनें उठाउठी । बांधवितो आपणिया ॥१॥
ऐसा भुकेला चिंतनाचा । न पाहे यातीहीन उंचाचा । काय अधिकार शबरीचा । फळे काय प्रिय ती ॥२॥
एका जनार्दनी चिंतन । तेणे जोडे नारायण । आणिक न लगे साधन । कलीमाजी सर्वथा ॥३॥
