कुंकुम केशराचे समाधी
1167.
कुंकुम केशराचे समाधीसी सडे | पहाती निवाडे जनलोक ॥१॥
गोदातीरी महोत्सव चांगदेवा | पूर्ण तू विसावा पांडुरंगा ॥२॥
समाधीभोंवते उभे साधुसंत | उतरले आंत चांगदेव ॥३॥
निवृत्ति पांडुरंग गेले समागमे | वैष्णव रामराम बोलताती | |४॥राहि रखुमांबाई उभ्या दोही बाही | मध्ये मुक्ताबाई संबोखिती ॥५॥
नामा पुंडलिक करिती समाधान | स्थिर करा मन बोधभावे ॥६॥
