वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 64. चिंतनमहिमा - अभंग ११४५ ते ११६

हरे भवभय व्यथा चिंतन

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085577 · अभंग क्र. ११४७

1147.
हरे भवभय व्यथा चिंतनें । दुर पळती नाना विघ्नें । कलीं कल्मष बंधनें । न बांधती चिंतने ॥१॥
करा करा म्हणोनि लाहो । चिंतनाचा निर्वाहो । काळाचा तो बिहो । दुर पळे चिंतनें ॥२॥
हीच माझी विनवणी । चिंतन करा रात्रंदिनी । शरण एका जनार्दनी । रामनाम चिंतावें ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग