उठियेले देव गोपाळ मं
1160.
उठियेले देव गोपाळ मंडळी' | बैसले ते पाळी समाधीचे ॥१॥
तिशी सर्व कीर्तन वद्य माघमासी | व्रत एकादशी गोदातीरी ॥२॥
द्वादशी पारणे वैष्णव सोंडिती | बैसल्या त्या पंक्ती सिद्धेश्वरी ॥३॥
सिद्धेश्वरी पूजा केली चांगयाने | पात्रे नारायण टाकू लागे ॥४॥
राही रखुमाई करिती पक्वान्ने| सोडितो पारणे चांगदेव ॥५॥
चांगदेवासंगे निवृत्ति मुक्ताई | बसले ते पाही वैष्णवांत ॥ ६ |नामा म्हणे आता करावी भोजने | ताटे रखुमाईने विस्तारिली ॥७॥
