नाम पवित्र आणि परिकर
1165.
नाम पवित्र आणि परिकर । नामे तरले दोषी अपार । नामे हेंचि निजसार । आधार वेदशास्त्रांचे ॥१॥
तारक कलिमाजीं नाम । भोळ्याभाविकां सुगम । ज्ञाते पंडित सकाम । नामे तरती श्रीहरींच्या ॥२॥
मनी माझ्या ऐक गोष्टी । नाम जपेंतु सदा कंठी । एका जनार्दनी परिपाठी । नाही गोष्टीं दुसरी ॥३॥
