अवघ्या विद्येचा करून
1155.
अवघ्या विद्येचा करूनी अभ्यास | पावलो मी क्लेश देवराया ॥१॥
मुक्ताबाई योगे उतरलो भवसिंधु | तैशी दीनबंधु कृपा करी ॥२॥
पतितपावन नाम तुझे थोर | करी अंगिकार अनाथाचा ॥३॥
धन्य आमुचे भाग्य जाहले दर्शन | अंगे नारायण साहित्य करी ॥४॥
चांगदेवे ऐसे आठविले फार | केला नमस्कार नामा म्हणे ॥५॥
