देव रुक्माबाई आणिक स
1097.
देव रुक्माबाई आणिक साधुजन | करिती समाधान निवृत्तीचे ॥१॥
ज्ञानियांनी ऐसी करावी जंव खंती | अज्ञानाचा किती पाड आला ॥२॥
धन्य तुमचा महिमा बोलती पुराणी | दृश्य कांही मनी आठवू नये ॥३॥
आकाशाचे ठायी अभ्रे येती जाती | कोण त्याची खंती करू पाहे ॥४॥
अवतारादिक गेले आले अपार | जैसा का विस्तार मृगजळाचा ॥५॥
नामा म्हणे देवे धरियेले हाती | उठविली विभूति निवृत्तिराज ॥६॥
