गरुड हनुमंत मुक्ताई
1098.
गरुड हनुमंत मुक्ताई सोपान | देव साधुजन आनंदले ॥१॥
मागे पुढे संत पताकांचे भार | मध्ये ज्ञानेश्वर मिरवतो ॥२॥
टाळ आणि विणे मृदुंग गायन | करिती कीर्तन सुस्वरेंसी ॥३॥
जयजयकार ध्वनि करिती सुरगण | वर्षती सुमन स्वर्गीहुनी ॥४॥
हरिपाठ गजर करिती अपार | नामा म्हणे भार उठविले ॥५॥
