धन्यरुप झाला काळ ।
1095.
धन्यरुप झाला काळ ।
करिता कथा गदारोळ ॥१॥
आजि पोखल्या आयणी ।
प्रेमसुखाचिया जेवणी ॥२॥
होउनी ठेला दिव्यरुप ।
पुण्य निरासेनिया पाप ॥३॥
निळा म्हणे निमग्नता ।
झाली मन बुध्दि चित्ता ॥४॥
1095.
धन्यरुप झाला काळ ।
करिता कथा गदारोळ ॥१॥
आजि पोखल्या आयणी ।
प्रेमसुखाचिया जेवणी ॥२॥
होउनी ठेला दिव्यरुप ।
पुण्य निरासेनिया पाप ॥३॥
निळा म्हणे निमग्नता ।
झाली मन बुध्दि चित्ता ॥४॥