वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 152. श्री सोपानदेवांची समाधी

स्पष्ट जोडोनिया कर |

🙏 4. संत नामदेव · ABH-081652 · अभंग क्र. १११६

1116.
स्पष्ट जोडोनिया कर | मी दासानुदास अपार | प्रार्थना करुनि नमस्कार | उतरी पार भवाब्धि ॥१॥
निवृत्ति मुक्ताई परियेसी | योगीराज जाला उदयासी | वद्य कार्तिक मासी | आळंकापुरी जावे लागे ॥२॥
ज्ञानदेवे मागितला मान | देव वैष्णवांचे आगमन |येऊनि गंधर्वाचे विमान | विधि नारायण संपादिला ॥३॥
इंद्रनीळ पर्वत पुरातन | पुर्वी येथे ब्रह्मयाचे स्थान |कोंडण्यपुरी अंबिकाभुवन | महाब्रह्म योग माया ॥४॥
तिची भावे केली पुजा | परमार्थ साधिला स्वहित काजा | मुक्ताई आणि निवृत्तिराजा | सोपान सहजा सिद्ध जाले ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग