वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १८. कीर्तनपर

श्रीहरिच्या संकीर्तन

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088942 · अभंग क्र. ११०४

1104.
श्रीहरिच्या संकीर्तने ।
तुटली बंधने बहुतांची ॥१॥
होऊनिया उपरती ।
राजा परीक्षिती उध्दरला ॥२॥
कीर्तने नारद मुक्त शुक ।
आणि सनकादिक प्रल्हाद ॥३॥
निळा म्हणे हरीची कथा ।
एकात्मता देवाभक्ता ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग