वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 152. श्री सोपानदेवांची समाधी

पूवकथा संवत्सरनगरी |

🙏 4. संत नामदेव · ABH-081643 · अभंग क्र. १११२

1112.
पूवकथा संवत्सरनगरी | सांगितली असे अवधारी | मग शोषाद्रि पर्वतावरी | गरुड शिखरी उभा असे ॥१॥
धन्य धन्य हा सोपान | धन्य समाधि संपूर्ण | प्रत्यक्ष येऊनि नारायण | अभयदान दिधलेंसे ॥२॥
अनंत वैष्णव प्रेमळ | दिडी पताका टाळ घोळ | रामकृष्ण नाम सरळ | भक्त सर्वकाळ नाचती ॥३॥
दिव्य उतरली विमाने | देव वर्षेती सुमने |इंद्र चंद्र देवगणे | लोटांगण घालती ॥४॥
समाधिसुखाचा आनंद | अंगे करीतसे गोविद |कथा सांगितली अभेद | श्रोते सन्निध सकळी ॥५॥
म्हणती धन्य धन्य सोपान | देव पुरुष चतुरानन |संत महंत वैष्णव प्रमाण | रामकृष्ण गाताती ॥६॥
नामा म्हणे देवराव | मनोरथ पूर्ण करोनि सर्व | अपार गुणकीति लाघव | न कळे माव कोणाशी ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग