वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 62. हरिनाममहिमा - अभंग १०७१ ते १११९

अष्टांग साधन न करी व

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084926 · अभंग क्र. ११०५

1105.
अष्टांग साधन न करी वाउगें । धूम्रपान वेगे कासया करिसी ॥१॥
मनी हरि धरी मनी हरि धरी । वाउगा तुं फेरीं पडों नको ॥२॥
साधन फुकट वाउगे ते कष्ट । वेगे धरी हरि वरिष्ठ मनामाजीं ॥३॥
साधन साधिता शिणताती मुनी । तो हरि कीर्तनी नाचतसे ॥४॥
सायास न लगे करावे ते कांही । एका जनार्दनी पायी बुडी दिली ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग