श्री सोपानदेव समाधी
1107.
श्री सोपानदेव समाधी
मग उड्डाण केले गरुडे । गगन आक्रमिले चंडे ।
वरी आरुढले प्रचंडे । भक्त देव सकळिक ॥१॥
पक्षाचेनि फडत्कार । ग्राम ठाकिला संवत्सर ।
गिरीकडे पठार । शिखरी गरुड उतरला ॥२॥
ते दिनी समारंभ केला । महा उत्सव तरिसी जाला ।
जयजयकार प्रवर्तला । विमाने दाटली आकाशी ॥३॥
दृष्टी देखावया कौतुक । शिवगण आले सकळिक ।
कर्ता ब्रह्मांडनायक ते कौतुक अवलोकिती ॥४॥
मुनि पुंडलिक उतरला । संगती वैष्णवांचा मेळा ।
समाधि लक्षण डोळा । पाहती देव सकळिक ॥५॥
हाते खाणोनि भूमिका । अमृत शिंपुनी सुगंधिका ।
महामंगळिक सुखा । वेदघोष आरंभिले ॥६॥
नामा म्हणे सुखसंगती । वैष्णव हरिनाम जर्जती ।
लक्ष्मी नारायेण क्षिती । उतरोनि समाधि देताती ॥७॥
