वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १८. कीर्तनपर

सांगो जाता न कळे वाच

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088950 · अभंग क्र. ११०५

1105.
सांगो जाता न कळे वाचा ।
महिमा कथेचा अपार ॥१॥
श्रवणे पठणे हरिची कीर्ती ।
नाना याति उध्दारल्या ॥२॥
चतुष्पदे श्वानसूकरे ।
श्रवणवदारे मुक्ति त्या ॥३॥
निळा म्हणे कीटक पक्षां ।
कीर्तने वृक्षा हरिप्राप्ती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग