वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 151. श्री ज्ञानेश्वर समाधी

समाधी परिपूर्ण बैसले

🙏 4. संत नामदेव · ABH-081747 · अभंग क्र. ११०६

1106.
समाधी परिपूर्ण बैसले ज्ञानेश्वर | उठविले भार वैष्णवांचे ॥१॥
आळंकापुरी सव्य घेतली ते संती | दिली भागीरथी ज्ञानालागी ॥२॥
भैरवापासुनि उगम निरंतर | रानोमाळ झरे तीर्थ गंगा ॥३॥
सैघ इंद्रायणी वाहाती मिळोनी | अखंड क्षणी वोघ जाती ॥४॥
चालिले विमान गंधर्व सुरगण | यात्रा परिपूर्ण जाली म्हणती ॥५॥
तीर्थ महोत्साह जाला सारासार | देव ऋषीश्वर परतले ॥६॥
वैष्णवांचे भार निघाले बाहेर | केला जयजयकार सर्वत्रांनी ॥७॥
पंढरीचा पोहा निघाला बाहेर | गरुडावरी स्वार देव जाले ॥८॥
नामा म्हणे ऐसा सुखी ज्ञानेश्वर | जाला असे स्थिर ब्रह्मबोधे ॥९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग