वैराग्याचा मेरु तो ग
1101.
वैराग्याचा मेरु तो गोरा कुंभार ।
तोडियले कर आणेसाठी ॥१॥
महाव्दारी कथा श्रवण करिता ।
टाळी वाजविता निघती नवे ॥२॥
तुम्ही देवा कृपादृष्टी अवलोकिला ।
ह्रदयी तो धरिला प्रीतिकरी ॥३॥
निळा म्हणे तुम्हा दासाचा अभिमान ।
अवतार म्हणूवन धरणे लागे ॥४॥
