देखोनिया संतमेळा ।
1094.
देखोनिया संतमेळा ।
कीर्तन सोहळा धाव घाली ॥१॥
ऐकावया आपुली नामे ।
गुणसंभ्रमे नित्य नवे ॥२॥
बैसोनिया प्रेम वांटी ।
नाचे परवडी मग सवे ॥३॥
निळा म्हणे आपुल्या सुखे ।
वांटी हारिखे भुक्ति मुक्ति ॥४॥
1094.
देखोनिया संतमेळा ।
कीर्तन सोहळा धाव घाली ॥१॥
ऐकावया आपुली नामे ।
गुणसंभ्रमे नित्य नवे ॥२॥
बैसोनिया प्रेम वांटी ।
नाचे परवडी मग सवे ॥३॥
निळा म्हणे आपुल्या सुखे ।
वांटी हारिखे भुक्ति मुक्ति ॥४॥