जयाचीं ती अनंत नामे
1117.
जयाचीं ती अनंत नामे । अनंत अवतार अनंत जन्में ॥१॥
अगाध श्रीहरीचा महिमा । त्याचा पार नेणे ब्रह्मा ॥२॥
अवतार चरित्र नामे । परिसतां निवारे कर्मे ॥३॥
जे जे अवतारी देव सगुण । गाईले निर्गुणाचे गुण ॥४॥
धन्य धन्य ते भाग्याचे । हरिगुण वर्णिती वाचे ॥५॥
कांही सगुण निर्गुण ठाव । अवघा एकचि देंही देव ॥६॥
एकपणे वेगळा । एका जनार्दनी देखिला ॥७॥
