सोपा मंत्र द्वदश अक्
1114.
सोपा मंत्र द्वदश अक्षरीं । वाचे जपे तुं निर्धारी । अंतकाळी हरी । न विंसबे तुजसी ॥१॥
धन्य धन्य मंत्रराज । तेणे साधिले बहुकाज । आम्हं सांपडले निज । वैकुंठभुवनाचें निर्धारे ॥२॥ मन करी गा बळकट । जपे वरिष्ठावरिष्ठ । एका जनार्दनी वाट । सोपी मग सहजची ॥३॥
१११५
येणेंचि नामे तारिले बहुता । दोषी तो पुरता अजामेळ ॥१॥
गणिका आणि वाला अजामेळ भिल्लणी । गोपाळ गौळणी तारियेल्या ॥२॥
गजेंद्र तो पशु नाडितां जळचर । धांवे देव सत्वरें ब्रीदासाठीं ॥३॥
प्रल्हाद संकट पडता निवारी । चोखयाचें करी बाळंतपण ॥४॥
दामाजीचा महार होऊनियां ठेला । उणेंपण त्याला येवो नेदी ॥५॥
एका जनार्दनी भक्तांचा अंकित । उभाचि तिष्ठत विटेवरी ॥६॥
