परसा भागवते केला नमस
1101.
परसा भागवते केला नमस्कार | सारे लहान थोर जमा जाले ॥१॥
सकळांचिया पायी नमियले नमना | केली प्रदक्षिणा समाधीसी ॥२॥
प्रथम पायरी बाहेरील जेथ | उभा पंढरीनाथ भेटावया ॥३॥
देव म्हणे बापा अमृत नेदी पाट | फार केले कष्ट जगासाठी ॥४॥
नामा म्हणे यांनी अनुभवाच्या नौका | पार केले लोका जडमूढा ॥५॥
