वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 151. श्री ज्ञानेश्वर समाधी

देव म्हणे ऐसे आठवाल

🙏 4. संत नामदेव · ABH-081758 · अभंग क्र. १०९३

1093.
देव म्हणे ऐसे आठवाल कोठवर | होईल उशीर समाधीशी ॥१॥
निरंजनी समाधि निरांतर तुम्हांसी | व्यर्थ कसाविसी होऊ नये ॥२॥
निवृत्तीसी पोटी धरिले देवाने | केले समाधान अवधियांचे ॥३॥
ब्रह्मणि ही कळा पुढे मुक्ताबाई | देवा सांगा कांही आम्हांलागी ॥४॥
देव म्हणे तुज येणे जाणे नाही | अनुभवोनि पाही जीवन्मुक्ती ॥५॥
म्हणे मुक्ताई सख्या ज्ञानेश्वरा | प्रार्थना तुम्ही करा देवालागी ॥६॥
ज्ञानदेवे वचन घातले देवांवर | विश्वाचे मनोर पांडुरंग ॥७॥
नामा म्हणे स्वामि प्रेमाचिया रंगे | बोलावणे स्वांगे करू आम्ही ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग