महा मात्रा हरीचे नाम
1112.
महा मात्रा हरीचे नाम । तरती अधमादि अधम । हाचि कालिमाजीं धर्म । नामापरते न देखे ॥१॥
जगी नाम तारक नौका । आन उपाय नाही देखां । साधन साधिता साधकां । नामापरते थोर नाही ॥२॥
धरा विश्वास बांधा गांठी । नाम जप जगजेठी । एका जनार्दनी भय पोटी । नाही तुम्हा काळाचे ॥३॥
