वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 151. श्री ज्ञानेश्वर समाधी

निवृत्तीदेव म्हणे सा

🙏 4. संत नामदेव · ABH-081781 · अभंग क्र. १०९५

1095.
निवृत्तीदेव म्हणे सांगतो या वाचे | राहाणे चौघांचे एकरूप ॥१॥
त्रिवेणीचा ओघ जैसा एके ठायी | तैसी मुक्ताबाई आम्हांमध्ये ॥२॥
ब्रह्माविष्णुहर जैसे एके ठायी | तैसी मुक्ताबाई आम्हांमध्ये ॥३॥
रज तम गुण सत्व गुणाठायी | तैसी मुक्ताबाई आम्हांमध्ये ॥४॥
भूचरी खेचरी चांचरी ते पाही | अगोचरा ठायी मुक्तगंगा ॥५॥
प्रथम ज्ञानेश्वरे काढियेली वाट | धरियेले वैकुंठ आळंकापुरी ॥६॥
इंद्रनीळ पर्वत नेमिला सोपाना | निवृत्तीसी जाणा त्रिंबकेश्वर ॥७॥
चौथी मुक्ताबाई नेमियली तापी | नामा म्हणे ख्याती केली यांनी ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग