वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 151. श्री ज्ञानेश्वर समाधी

निवृत्तिदेव म्हणे कर

🙏 4. संत नामदेव · ABH-081776 · अभंग क्र. १०९६

1096.
निवृत्तिदेव म्हणे करिता समाधान | कांही केल्या मन राहात नाही ॥१॥
बांधल्या तळ्याचा फुटलासे पाट | ओघ बारा वाट मुरडताती ॥२॥
बांधल्या पेंढीचा सुटलासे आळा | तृण रानोमाळा पांगलेसे ॥३॥
हरिणीवीण खोपी पडियेली वोस | दशदिशा पाडसे भ्रमताती ॥४॥
मायबापे आम्हा त्यागियेले जेव्हा | ऐसे संकट तेव्हा जाले नाही ॥५॥
नामा म्हणे देवा पेटला हुताशन | करा समाधान निवृत्तीचे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग