वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 152. श्री सोपानदेवांची समाधी

नमो अगणित गुणा । नमा

🙏 4. संत नामदेव · ABH-081631 · अभंग क्र. ११०९

1109.
नमो अगणित गुणा । नमा आगमगुणनिधाना ।
नमो कलीविध्वंसगहना । कालहनना तुज नमो ।।१।।
प्रेमळ वैष्णव नैष्ठिक पूर्ण । गाती नामसंकीर्तन ।
हांहा हु हु गंधर्व देवगण । करिती गायन सुस्वर ।।२।।
हर्षे मंगळ वाद्दे वाजविती । वैष्णव सप्रेमे नाचती ।
नामा म्हणे पुढतापुढती समाधीस्थिती अखंड ।।३।।

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग