गंगेच्या प्रवाहा साग
91.
गंगेच्या प्रवाहा सागरीच गति ।
बोलताती श्रुती ब्रह्मवरी ॥१॥
तैसी जाण बुद्धि चाले तोचिवरी ।
निश्चय-शिखरी निमोनि जाये ॥२॥
पतिव्रते काम वाढे तो भ्रतारी ।
सूर्य तो अंबरी प्रभा दावी ॥३॥
बहेणि म्हणे तैसे संतांचे बोलणे ।
साक्षात्कार मने होय जीवा ॥४॥
