वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ३. कृष्णचरित्र

अवघे करुनि जयजयकार ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089927 · अभंग क्र. ८६

86.
अवघे करुनि जयजयकार ।
हषे झाले सुखनिर्भर ।
म्हणती आता वारंवार ।
भय संकोचि न धरावा ॥१॥
तव यशोदा म्हणे पूर्वीही ऐसे ।
गर्गाचाये कथिले विन्यासे ।
राशिनक्षत्राचेनिया मिसे ।
उदंड भाषार्थ सांगितला ॥२॥
पुढे वधील कंसासुरा ।
सोडवील हा मातापितरा ।
मथुरेसी उग्रसेना नृपवरा ।
भद्र सिंहासनी बैसवील ॥३॥
करील धर्मांचे पाळण ।
सकळ पांडवाचे संरक्षण ।
भीमकीचेही पाणिग्रहण ।
करील अरिर्वारा मर्दुनी ॥४॥
वधूनिया भोमासुरा ।
सोळा सहस्त्र अंत:पुरा ।
प्रणूनिया हा एकसरा ।
पुत्रपौत्री नांदेल ॥५॥
कौरवा वधील पांडवाहाते ।
राज्यी स्थापील हा धर्माते ।
उतरुनी भूभाराते ।
अवनी उत्फुल्लित करील ॥६॥
गोकुळींचिया नगरनारी ।
रंजवील हा नानापरी ।
गोवळ गाईचा मनोहरी ।
क्रीडा करील हा कौतुके ॥७॥
अतुर्बळिया नारायणु ।
याशोदे तुझा हा नंदनु ।
नाटकी कौसाल कान्हु ।
करील पवाडे अगणित ॥८॥
निळा म्हणे ते प्रसंगी ।
स्मरले अवघे यशोदेलागी ।
मग नाना वस्तु पदार्थ चांगी ।
वरुनी सांडी श्रीकृष्णा ॥९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग