वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ३, नामसंकीर्तन महात्म्य > अभंग ८५ ते १०९

श्रवण त्वचा चक्षु जि

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075184 · अभंग क्र. ९२

92.
श्रवण त्वचा चक्षु जिव्हा घ्राण ।
दशहि इंद्रिये जाण हरीच्या ठायी ॥
अवघा हा गोविंदु अवघा हा मुकुंदु ।
अवघा हा विद्गदुभरला दिसे ॥
पतीतपावन नामे दिनोद्धारण ।
स्मरलिया आपण वैकुंठ देतु ॥
ज्ञानदेव म्हणे हे पुंडलीक जाणे ।
अंतकाळी पेणे साधियेले ॥

अर्थ :
पंचज्ञानेंद्रिये व पंचकर्मेंद्रिये याची जीवाला प्राप्ती त्याच्यामुळेच होते व त्यांच्या आधारे त्याला प्राप्त करुन घेता येते. तोच अवघा गोविंद, मुकुंद होऊन जगाच्या भार सांभाळत विदगद म्हणजे तापला आहे. तोच पतीताला पावन करणारा दिनांचा उध्दार करणारा असुन भक्ताला तो उदारपणे वैकुंठ ही देतो. पुंडलिकरायांनी हाच शेवटचा मार्ग आहे हे जाणुन त्याची प्राप्ती करुन घेतली असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग