आता कासया हा दाखविता
92.
आता कासया हा दाखविता खेळ । म्या तंव सकळ जाणितला ॥१॥
जेथे ब्रह्मादिक वेडे पिसे झाले । न कळे वहिले तयांलागी ॥२॥
कोणासी हा पार न कळे तुमचा । काय बोलो वाचा कीर्ति तुमची ॥३॥
चोखा म्हणे तुमचा अविठ हा खेळ । भुलले सकळ ब्रह्मांडाचि ॥४॥
