वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 53. राधा विलास

मध्यान्हकाळी मग हरीस

🙏 4. संत नामदेव · ABH-083186 · अभंग क्र. ८८

88.
मध्यान्हकाळी मग हरीसी घेऊनि । करीतसे भोजन यशोदा ते ॥१॥
भोजन करूनि पलंगी निजत । श्रीकृष्णासी घेत पुढे तेव्हा ॥२॥
यशोदेसी सुखनिद्रा हो लागली । राधिका ते गेली यमुनेसी ॥३॥
नेत्रासी पदर लावोनि रडत । अंतरी अनंत आठ-वोनि ॥४॥
करुणा शब्द तिचा ऐकोनि श्रवणी । उठला चक्रपाणी तेथोनिया ॥५॥
जावोनिया राधा धरिली पदरी । तिजलागी हरि समजावित ॥६॥
संसारासी माझ्या पडियेले पाणी । ऐसे चूक्र-पाणी तुवा केले ॥७॥
इकडे यशोदा ती जागी जंव होत । हरिसी धुंडीत तयेवेळी ॥८॥
एखादी हा कळी घेऊन येईल आता । पाहातसे माया चहूंकडे ॥९॥
पाउलाचा माग चालिली काढीत । पावली त्वरित यमुनातीरा ॥१०॥
राधा तयेवेळी ह्मणे रे अनंता । पैल तुझी माता येत असे ॥११॥
मातेसी देखूनि गडबडा लोळत । यशोदा ते घेत कडेवरी ॥१२॥
मातेसी ह्मणत चोरोनि कंदूक । घेऊनिया देख आली येथे ॥१३॥
माता ह्मणे का वो यासी रड-विसी । चेडु तू हरिसी देई वेगी ॥१४॥
मामी हा मजवरी घेई गे तुफान । मजपाशी जाण चेंडु नाही ॥१५॥
कृष्ण ह्मणे माते झाडा घेई आता । कंदूक तत्त्वता निघेल पै ॥१६॥
वस्त्र जंव झाडीत राधा तयेवेळी । पडिला भूतळी कंदूक तो ॥१७॥
ऐसे देखोनिया लज्जित जहाली । हांसत वनमाळी नामा ह्मणे ॥१८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग