वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 2. संपूर्ण काकडा भजन › ८, आंधळे अभंग

दाते बहुत असती परि न

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073097 · अभंग क्र. ८७

87.
दाते बहुत असती परि न देती साचार । मागत्‍याची आशा बहु तेणे न घडे विचार ।
सम देणे सम घेणे या नाही प्रकार । लाजिरवाणे जिणे दोघांचे धर्म अवघा असार ॥१॥
तैसा नोहे दाता माझा जनार्दन उदार । तुष्‍टला माझया देही दिधले अक्षय अपार ।
न सरेचि कल्‍पांती माप लागले निर्धार । मागतेंपण हारपले दैन्‍य गेले साचार ॥२॥
देऊनी अक्षय दान पदा बैसविला अढळ । मायामोह तृष्‍णा हाचि चुकविला कोल्‍हाळ ।
एका जनार्दनी एकपणे निर्मळ । शरण एका जनार्दनी कायावाचा अढळ ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग