प्रात: काळी मुले येत
92.
प्रात: काळी मुले येताती सकळ । उठवी गोपाळ ह्मण-ताती ॥१॥
आळस देवोनी उठे देवराणा । बळिराम गोधना सोडी-तसे ॥२॥
देऊनिया स्तना काकुळती येत । सांभाळा भगवंत वना-मध्ये ॥३॥
जवळींच खेळा जाऊ नका दूरी । सांभाळा मुरारी प्राण माझा ॥४॥
होताती उत्पात याजवरी मोठे । मोडतील कांटे सांभा-ळावे ॥५॥
आसनी शयनी भोजनी जतन करा । नामया दातार केशिराजा ॥६॥
