वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

गर्व जयापासी नाही अण

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075783 · अभंग क्र. ८९

89.
गर्व जयापासी नाही अणुमात्र ।
सर्वांगे पवित्र संतवृत्ति ॥१॥
तेचि एक साधु तारितील जन ।
भ्रांती हे हिरोन ज्ञान देती ॥२॥
अंतर्बाह्य शुद्ध सूर्याचिये परी ।
ज्ञान कर्म करी बाह्यात्कार ॥३॥
रत्न की कर्पूर शुद्ध अन्तर्बाह्य ।
मनातील गुह्य सांगे जनी ॥४॥
कृपा जयापासी होउन आन ।
आनंदी निमग्न सदा काळी ॥५॥
बहेणि म्हणे मनी भूतकृपा पूर्ण ।
तेचि वोळखण संतजना ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग