वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 2. संपूर्ण काकडा भजन › ८, आंधळे अभंग

मार्ग बहु असती परि त

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073086 · अभंग क्र. ९२

92.
मार्ग बहु असती परि तयांची न कळे गती । म्‍हणोनि पडियलो माया मोहभ्रांती ।
तेणे मी जाहालो अंध कोण धरिल चित्‍ती । मारितो हांका मोठ्याने अहो उदार श्रीगुरुमुर्ति ॥१॥
धांव धांव श्रीगुरुराया काढी देऊनि हात । बुडतसे भवनदीमाजी न कळे अंत ।
शिण बहु मज जाहला श्रमलो पाहत पाहत । यांतुनी सोडी वेगी तुम्‍हा श्रीगुरुसमर्थ ॥२॥
वाटे आडवाट दरी दरकुटे यांमाजी गुंतले । कन्‍या पुत्र स्‍त्रीधन हे वर पाडिले जाळे ।
कवण उगवील कवणा शरण जाऊ ते न कळे । करितो चिंता हृ्दयी तंव श्रींगुरु प्रसन्‍न जाहले निवारली अवघी भ्रांती ॥३॥
एका शरण जनार्दनी जाहली संतोषवृत्‍ती । अंधपण फिटले निवारली पुनरावृत्‍ती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग