गोकुळजनांचे वृंदावनी
90.
गोकुळजनांचे वृंदावनी प्रयाण.
गोकुळी अनर्थ होताती बहुत । मिळोनी समस्त विचारिती ॥१॥
वृद्ध ते म्हणती येते आमुच्या मना । जाऊ वृंदावना सकळीक ॥२॥
समस्ता मानला तयांचा विचार । निघती नारीनर शीघ्र तेव्हा ॥३॥
अहिर्निशी देवा करिती जतन । नामा म्हणे मन गोविंदा पै ॥४॥
