ऐसे केशियाचे हनन ।
92.
ऐसे केशियाचे हनन ।
केले देखोनिया सकळ जन ।
गोकुळीचे विस्मयपत्र म्हणती
न कळे महिमान श्रीहरिचे ॥१॥
कृत्रिम वेषिया तुरंगम ।
आला इच्छूनिया सग्राम ।
कैसा जाणूनिया मेघ:शाम ।
तयावरी सरसावला ॥२॥
त्याची केलीचि कार्यसिध्द ।
तोडूनिया आधिव्याधि ।
बैसविला तो सभासंधी ।
मुक्तिस्थानी मुक्ताचिये ॥३॥
वार्ता गेली कंसासुरा ।
मर्दिले केशिया महावीरा ।
गोकुळी आनंद नारीनारा ।
हषे साखरा वांटिती ॥४॥
कंस म्हणे विपरीत भाग्य ।
झाले ओढवले उपसर्ग ।
गेले माझे हे अंगलग ।
आता विश्वास कोणाचा ॥५॥
गगनवाणी ऐकियेली जेव्हा ।
सुत देवकीचा आठवा ।
तोचि वधील दैत्या सर्वा ।
तो हे विपरीत वर्तले ॥६॥
गोकुळामाजी तुझा वैरी ।
नाही ऐकिले भविष्यातरी ।
एकचि वदली ते कुमारी ।
जे का निष्ठिली हातींची ॥७॥
व्यर्थचि पिडियेली देवकी ।
आणि वसुदेवही पुण्यश्रलोकी ।
होणार न चुकेचि की सेखी ।
विघ्न आणिकचि उदेले ॥८॥
निळा म्हणे ऐसियापरी ।
कंस निमग्न दु:खसागरी ।
गेली ऐश्रवर्याची धारी ।
पडिला शरीरी निचेष्टित ॥९॥
