वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ३, नामसंकीर्तन महात्म्य > अभंग ८५ ते १०९

यश किर्ती वानू नेणे

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075185 · अभंग क्र. ८९

89.
यश किर्ती वानू नेणे मी वाखाणू ।
रामकृष्ण आम्हा सणू नित्य दिवाळी ॥
नरहरी रामा नरहरि रामा ।
पुराणपुरुषोत्तमा हरि गोपाळा ॥
या नेमी अक्रूर बोधला परीक्षिति उपदेशिला ।
अर्जुनाशी जाला साहाकारी ॥
ज्ञानदेव म्हणे नामेवीण जो नरु ।
तो होय भूमीभारु ये संसारी ॥

अर्थ :
भगवंताचे यश कीर्ती सारखे षडगुण आहेत त्याची वाखणी मी करु शकत नाही. रामकृष्ण नामाचा उच्चारच आम्हाला नित्य दिवाळीचे सुख प्रतिदिन देतो. नरहरि, राम, पुराणपुरष, हरि, गोपाळ या सारख्या त्याच्या नांवामुळे परिक्षितीला उपदेश व अक्रुराला बोध झाला. व तेच नाम जपल्याने तो अर्जुनाचा साह्यकर्ता झाला. जो नर ह्या नामाचा अंगिकार करत नाही तो भूमीला भार आहे असे प्रतिपादन माऊली करतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग