अहो पतित पावना पंढरी
89.
अहो पतित पावना पंढरीच्या राया । भक्त विसाविया मायबापा ॥१॥
धांवे दुडदुडा आपुलिया काजा । येई गुरूडध्वजा मायबापा ॥२॥
दाही दिशा उदास तुम्हांविण झाल्या । न करी पांगिला दुजीयासी ॥३॥
चोखा म्हणे आता दावी मज वाट । मग मी बोभाट न करी कांही ॥४॥
