अहो पंढरीराया विनवित
87.
अहो पंढरीराया विनवितो तुज । अखंड संतरज लागो मज ॥१॥
नामाची आवडी उच्चार हा कंठी । करी कृपा दृष्टी मजवरी ॥२॥
पंगतीचे शेष उच्छिष्ट प्रसाद । तेणे सर्व बाध हरे माझा ॥३॥
चोखा म्हणे माझा हाचि नवस । पुरवी सावकाश देवराया ॥४॥