वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ३, नामसंकीर्तन महात्म्य > अभंग ८५ ते १०९

कापुरी परिमळु दिसे व

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075186 · अभंग क्र. ९१

91.
कापुरी परिमळु दिसे वो अळुमाळु ।
हळू हळू सुढाळू पवनपंथे ॥
पवनी न माये पवनही धाये ।
परतला खाये आपणासी ॥
मुखवात नाही तरतसे बाही ।
नांवे दिशा दाही आप घोषे ॥
ज्ञानदेवा मौन्य नामाचे तारण ।
दाहक हरिवीण दुजा नाही ॥

अर्थ :
कापुराचा सुवास जसा हळुवार अनुभवता येतो. तसेच प्राणायाम मार्गाने हळु हळु मार्गावर जाता येते. पवनामध्ये जसा प्राण पवन असतो तसा आत्मज्ञानामुळे तो त्या प्राणालाच आपणच आपण होऊन खाऊन टाकतो. तो आत्मज्ञानामुळे सर्वत्र तोच आहे हा भाव मुखाद्वारे घेऊन त्यासाठी तरसत बसत नाही. व त्याचा भाव त्याला सांगत असतो दाही दिशाना तोच भरुन उरला आहे. मौन होऊन त्या नामात रत झाले की तेच तारक होते व त्या हरिनामाशिवाय तारणारे काहीच नाही असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग