वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ३. कृष्णचरित्र

म्हणोनिया तेथे उगाचि

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089907 · अभंग क्र. ९१

91.
म्हणोनिया तेथे उगाचि उभा ।
यावया जवळी पहननाभा ।
तोहि सर्वसाक्षी ओथंबा ।
जाणे हदगत केशियाचे ॥१॥
मग चालत मंजुळ चाली ।
हळूहळूचि गेला जवळी ।
लगाम धरुनिया निज करतळी ।
हाते कुरवाळी मुखातरी ॥२॥
मग रिकेबी देवोनि पावो ।
चढला वरी यादवरावो ।
हालो नंदिताचि नवलवो ।
घातला भार त्रिभुवनांचा ॥३॥
केशीया पाहे उडावया ।
तव ओझे भारी नुचलवे पाया ।
म्हणे गेली व्यर्थचि माया ।
रचिले येवढे लाघव ते ॥४॥
मग न चलवे ऐसे जाणेनि हरी ।
बारवा फोडिला चाबुकावरी ।
केशिया ह्रदयींचि रुदन करी ।
म्हणे घेतला प्राण निश्रचयेसी ॥५॥
हालो नेदीची हा गोंवळ ।
महाबलीया आमुचा काळ ।
कृष्ण म्हणे हे मुसळ ।
व्यर्थचि पोसिले बेटियाने ॥६॥
चारुनिया दाणाचार ।
पुष्ट केला बहु थोर ।
नाही मिनला चाबुक स्वार ।
तोंचिवरी शोंभला ॥७॥
मग उतरला झडकरी ।
हाती धरिली लगाम दोरी ।
तव तो उपायी येऊनिया वरी ।
हाणो धावे टापेने ॥८॥
मागे पेर वाळे झाडित ।
आडवाचि उडे मग कुकात ।
तोंड पसरुनिया विचकी दात ।
डसावया श्रीहरी ॥९॥
येरु आतळोंचि नेदी त्या अंगा ।
धरिले आंवरुनिया तुरंगा ।
घायातळी आणूनिया चांगा ।
ताडिला मुष्ठीप्रहरे करुनि ॥१०॥
तेणेचि तया आली तव ।
म्हणे कंसा वेगी धाव धाव ।
वेचलो जीवेम करी कणव ।
सोडवी मज याच्या हाती ॥११॥
तुझिया काजा वधावा हरी ।
म्हणोनिया आलो येथवरी ।
तव हा लाघविया मुरारी ।
बैसला जिव्हारी काय करु ॥१२॥
पायी बांधोनिया टाकिले ।
माझियाचि भूषणी मज गोंविले ।
नाही अंतरी हे मज कळले ।
कैसे करु हदयासी ॥१३॥
ऐसी या विलापे आक्रंदता ।
प्राण सोडिले तत्वता ।
म्हणे मी फिरांनिया मागुता ।
न येचि येथे श्रीकृष्णा ॥१४॥
निळा म्हणे ऐकोनि श्रीकृष्ण ।
म्हणे वाग्देवी तुझी तुज प्रसन्न ।
जारे मुक्ति पदी बैसोन ।
वस्ती करी तेथे सुखे ॥१५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग