वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 2. संपूर्ण काकडा भजन › ८, आंधळे अभंग

मी माझे कल्‍पनेने जा

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073108 · अभंग क्र. ८८

88.
मी माझे कल्‍पनेने जाहलोंसे पांगुळ । चालता न चलवेंचि कोठे नमिळे स्‍थळ ।
हिंडतो दिशा दाही श्रम जाहला केवळ । कवण ही भ्रांती वारी कै भेटेल गुरुदयाळ ॥१॥
धर्म जागो गुरु महिमा देही दाविला देव । निवारुनी भवर जाळे अवघा निरसला भेव ॥२॥
कर्म त्‍या अकर्माच्‍या लागती वाटे ठेंसा । संपत्‍ती विपत्‍तीचा मानिला भरवसा ।
कन्‍या पुत्र आप्‍त जन हा तो सहज वोळसा । या भ्रम डोही बुडालो धांवे गुरुराया सर्वशा ॥३॥
येऊनि गरुनाथे माथा ठेविला करु । अज्ञान तिमिर गेले शुध्‍द मार्ग साचारु ।
गर्जत चालियेलो फिटला अज्ञान अंधारु । एका जनार्दनी माझा श्रीगुरु उदारु ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग