वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ३, नामसंकीर्तन महात्म्य > अभंग ८५ ते १०९

आलिया जवळा भक्तिसुख

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075198 · अभंग क्र. ८७

87.
आलिया जवळा भक्तिसुख देखे ।
पालव पोखे वाणिव भोगी ॥
ते सुख आम्हा विठ्ठल चरणी ।
निवृत्ति करणी व्यासाचिये ॥
जप तप ज्ञान क्रिया कर्म धर्म ।
रामकृष्ण नेम गुरु भजने ॥
ज्ञानेदेवो म्हणे संसार निरसी ।
अखंड मानसी विठ्ठल हरि ॥

अर्थ :
भक्तिचा आनंद काय असतो व तो कसा भोगायचा तर संतांच्या जवळच जावे लागते. निवृत्तिनाथ व व्यांस ह्यांच्या कृपेमुळे हे सुख मला विठ्ठल चरणाजवळ सापडते. जप तप हा ज्ञान व कर्म मार्ग आहे व त्यामुळे रामकृष्णांचे भजन गुरुकृपेने करता येते. सतत विठ्ठलाला मनात स्मरल्यास संसाराचा निरास होतो असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग