मृत्युलोकी एक नगर त
91.
मृत्युलोकी एक नगर त्याचे नांव पंढरपूर । तेथील मोकाशी उभा असे विटेवर ।
पुंडलिक भक्तराज शोभे चंद्रभागातीर । बोलती साधुसंत जिवा वाटे हुरहूर ॥१॥
तुम्ही संत मायबाप ऐवढा उपकार करा । न्या मज तेथवरी दाखवा दीनांचा सोयरा ॥२॥
मज नाही हातपाय डोळा पडली झापड । कर्ण हे बधिर झाले वाचा बोले बोबड ।
नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड । श्वानापरी गती झाली अवघे करिती हाड हाड ॥३॥
साधुसंत मायबाप जे का दयेचे सागर । भावाचे मुख्य स्थान भक्तीचे ते माहेर ।
तिही केले कृपादान मस्तकी ठेविला कर । माया मोह निरसली शुध्द झाले कलेंवर ॥४॥
भाव दिला मज सांगाते मार्ग दाविला निट । भ्रांति हे समूळ गेली दिसू लागली वाट ।
नाचता प्रेमछंदे चालू लागलो सपाट । एकाजनार्दनी पावलो पंढरी पेंठ ॥५॥
