अश्वरुपिया केसासूर ।
90.
अश्वरुपिया केसासूर ।
ठाणमाण अति सुंदर ।
जैसा उच्चैश्रवा रहंवर ।
देवलोकी इंद्राचा ॥१॥
शोभिवंत तयाहुनी आगळा ।
असुई अवलोकिता डोळा ।
पाहावाचि ऐसा वेळोवेळा ।
आठवो नेदी आणि ॥२॥
शोधितांही सप्तव्दीपांतरु ।
नाढळेचि कोठे ऐसा वारु ।
सुंदराहुनी अति सुंदरु ।
रुपे नागरु भुलवणा ॥३॥
दांडिमान कळाव्या डोळे ।
कर्ण जैसे केतकिदळे ।
गुडघे सुंब मेजागळे ।
सर्वहि शृंगारमंडीत ॥४॥
खोगिर जीन लगाम तोंडी ।
इलाखे रिकेबियांची जोडी ।
गाशा वागदोर दुमाचिया दांडी ।
खुरुस नवरत्न खचितांचे ॥५॥
तव संवगडियांसी खेळत ।
आले अकस्मात गोपिनाथ् ।
वारु देखोनि गडिया म्हणत ।
पैल पहारे विचित्र तेजी ॥६॥
आम्हा राये कंसासुरे ।
बैसावया अति आदरे ।
धडिले हे वहान खरे ।
अनुवादिजे गडियासी ॥७॥
आता यावरी घालुनि स्वारी ।
पाहो बैसोनिया दुरी ।
बैसोनि पहावे गोपुरावरी ।
ऐसे सांगोनिया श्रीहरी ।
मग सांवरी आपणिया ॥९॥
आइता साज आहे वरी ।
रुपाकृत ही साजिरी ।
मायावी हा जाणेनिया हरी ।
कास कसिली बळकट ॥१०॥
निळा म्हणे मनोगत ।
आर्त केशियाचे उत्कंठित ।
वरी बैसलिया कृष्णनाथ ।
नेईन दिगांता उडवुनी ॥११॥
