वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

आदीची अनादि मूळ पै स

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090120 · अभंग क्र. ८६

86.
आदीची अनादि मूळ पै सर्वथा । परादि या कथा हारपती ॥१॥
ते अव्यक्त रूप देवकीचे बाळ । वसुदेवकुळ कृष्णठसा ॥२॥
मुराली ब्रम्हांडे अमिते पै अंडे । ढिसाळ प्रचंडे जया माजी ॥३॥
निवृत्तीचे धन माजी तो श्रीकृष्ण । सांगितला प्रश्न गायनिराजे ॥४॥

अर्थ:
तो परमात्मा सर्वंचे अनादि मूळ आहे. परा पश्यंती मध्यमा वैखरी सारखे ह्याचे वर्णन करताना हरपून जातात. तोच निर्गुण परमात्मा श्रीकृष्ण नामाची मुद्रा लाऊन देवकी वसुदेवाच्या कुळी जन्माला आला. त्या परमात्मरुपात अनेक ब्रह्मांडे लयाला जातात व अनेक नविन ब्रह्मांडांचे बीजारोपण होते. निवृत्तिनाथ म्हणतात, मी जेंव्हा गहिनीनाथांना विचारले की मुळ ठेवा कोणता तेंव्हा त्यांनी सांगितले माझा श्रीकृष्ण हाच मुळ ठेवा आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग