व्यापक हा हृषिकेशी ।
89.
व्यापक हा हृषिकेशी । आहे आम्हा पाशी । विश्वास मानसी धरा थोर ॥
चालविता बोलविता । सकळ त्याची सत्ता । त्या वाचुनी कर्ता नाही कोण्ही ॥
खास सुत्रधारी । खेळविता दोरी । नाचवी नानापरि । बाहुलिया ॥
बोधला म्हणे मीपण सांडा जाण । कर्ता नारायण पांडुरंग ॥
