मंथना आरंभ करीतसे रा
87.
मंथना आरंभ करीतसे राधा । आठवी गोविंदा मना-माजी ॥१॥
मेळवोनी मुले खेळे तिचे द्वारी । देखिला श्रीहरी राधि-केने ॥२॥
विसरोनी मंथन रित्या डेरीयांत । रवी फिरवित गरगरा ॥३॥
डेरा खडबडा वाजत ऐकोन । वृद्धा ते धांवोन बाहेर आली ॥४॥
सासू म्हणे काय गेले तुझे नेत्र । देतसे उत्तर राधा तीसी ॥५॥
डेरा धड किंवा फुटका म्हणुनी । रवी घुसळोनी पाहातसे ॥६॥
वृद्धा म्हणे तुझे चित्त नाही स्थीर । द्वारी हो श्रीधर देखियेला ॥७॥
रागे भरोनिया बोलत म्हातारी । येथे कांरे हरी खेळसी तू ॥८॥
कृष्ण ह्मणे आह्मी खेळतो बिदिशी । तू का दटाविसी थेरडिये ॥९॥
ऐसे बोलेनिया श्रीहरी पळाला । घरासी तो गेला नामा ह्मणे ॥१०॥
