यावरी बगासुराची कथा
87.
यावरी बगासुराची कथा ।
विचित्र आहे ते ऐकता ।
कृष्णकरे पावोनि घाता ।
महामुक्तीते वरील ॥१॥
मग तो बगरुपीया असुर ।
ध्यानस्थ यमुनातीरी स्थीर ।
झांकूनिया उभय नेत्र ।
एकाचि पायावरी उभा ॥२॥
कृष्ण घातावरी चित्त मनी चिुंतूनिया तिष्ठत ।
म्हणे केव्हा देखेन तो येथ ।
येता खेळत जवळी कै ॥३॥
बाळलीले येताचि जवळी ।
गटकाळीन जेवी मांसळी ।
हे जाणोनिया वनामाळी ।
आला खेळीमेळी गडियांसवे ॥४॥
तव तो पक्षिया देखिला कैसा ।
राजहेस का सरोवरीचा जैसा ।
शोभयमान निश्रचळ ऐसा ।
लेंकरे म्हणती चला धरु ॥५॥
कृष्ण म्हणे रे पक्षी क्रूर ।
नका जाऊ त्या समोर ।
मत्स्याही महा निष्ठूर ।
पापकर्मा दुरात्मा ॥६॥
तुम्ही राहा एकीकडे ।
मागेंचि लपोनिया गडे ।
जाऊनि मी पाहतो पुढे ।
उघडितो नेत्र की नाही ॥७॥
पहा लपत लपतचि जातो ।
आणी देईल धरु तरी आणितो ।
परी तुम्ही करा जे सांगतो ।
दुरीचि असा पैलाडी ॥८॥
तव पालवथाचे अवघक लोक ।
पाहाती कृष्णाचे कौतुक ।
म्हणत नंदाचा हा बाळक ।
पहारे कैसा पिलंगतो ॥९॥
निळा म्हणे जैसा चित्ता ।
हरणी देखोनिया तत्वता ।
सुरके भूमिची आतौता ।
तैसाचि हाही वेग करी ॥१०॥
